Keshav Shanknaad Pathak

|| केशव शंखनाद पथक ||

शंख वाजवायचे फायदे

शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. शंखातील शेल फुंकल्यामुळे धैर्य, दृढनिश्चय, आशा, आशावाद, इच्छाशक्ती आणि आनंद यासारखी सकारात्मक स्पंदने वाढतात हिंदू कुटुंबांमध्ये शंख वाजवणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. शंख वाजवल्याने वातावरणातील हानिकारक तत्त्व नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असे मानले आहे. परंतू हे आरोग्यासाठी सुध्दा उत्तम आहे हे कमी लोकांनाच माहीत असेल. 

आपल्या भारतीय सनातन संस्कृती आणि बौद्ध धर्मात शंखचे महत्त्व खूप जास्त आहे. हे केवळ पूजेमध्येच वापरले जात नाही, तर त्याची पूजाही केली जाते. प्रत्येक चांगली सुरुवात करण्यापूर्वी ते वाजवणे शुभ मानले जाते. यासह, असेही मानले जाते की महाभारताची सुरुवात श्री कृष्णाच्या शंखाने झाली होती. गरुड पुराणात असेही लिहिले आहे की कोणत्याही मंदिराचे दरवाजे उघडण्यापूर्वी शंख करणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच पूजा सुरू होऊ शकते. शंखो हे नेहमीच वाद्य म्हणून सादर केले गेले आहे. असे मानले जाते की त्यापैकी बहुतेकांचा वापर युद्ध सुरू करण्यासाठी किंवा समाप्त करण्यासाठी केला जात असे.

हिंदुस्थानातील पहिले एकमेव शंखवादकांचे पथक.....केशव शंखनाद पथक

केशव शंखनाद पथक

२०१७ मध्ये गणेशोत्सवात शंखनाद करायचा या उद्देशाने शंखनाद पथकाचा सराव पुणे महानगरातील प्रसिद्ध श्री ॐकारेश्वर मंदीरात एक महिना भर सुरू केला त्यात महिला व पुरुषसंख्या फक्त ५\७ होती नंतर ती वाढतच गेली. पुणे महानगरातील प्रमुख गणेश मंडळाच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करीत राहिलो व श्री गणेशोत्सवात विसर्जन मिरवणूकीत मानाचे गणपतीनां  स्थिर वादन करू लागलो. सुरवातीला नागरिकांना काही कळतंच नव्हते काय चाललंयं हळूहळू सवयीने शंखध्वनीने वेगवेगळे ताल,स्वर ,चाली वाजल्या की  मग काहीतरी नविन म्हणून नागरिकांना ते छान वाटू लागले तसेच २०१८ ला पण आम्ही सर्व गणेश मंडळाच्या  विसर्जन मिरवणूकी साठी सज्ज राहिलो व शंखनाद केले…

    आता पर्यंत शंखनाद पथक नागरिकांना कळून चुकले होते व गेल्या दोन वर्षांत आम्ही शंख वादना विषयी  मार्गदर्शन केले होते. शंख वादनाने आपल्या शरीरात व आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात यावर आम्ही लोकांना जागृत करत गेलो, त्याचाच उपयोग शंखवादकांच्या संख्येत झाला. पथकात नाही पण आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते म्हणून बरेच नागरिक शंख वाजवायला शिकवा म्हणून येत होते, आत्ता पर्यंत पथकातील शंखवादक व फक्त शंख वाजवायला शिकणाऱ्यांची  संख्या साधारण हजाराच्या वर गेली आहे. याचाच फायदा व सोशलमिडीयाच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरापर्यंत पोहचलो.युट्यूब वर आमचे  व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर २०१९ च्या जानेवारी महिन्यापासून आम्ही वर्षभर श्री ॐकारेश्वर मंदीरात महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी मोफत शंखवादन प्रशिक्षण वर्ग सुरु केलेत त्यात नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दर्शविला. २०१९ च्या श्री गणेशोत्सवात आम्हाला बऱ्याच मंडळांची  शंखवादनासाठी निमंत्रणे येत गेली आणि  गणेशभक्तांचा आदर राखून आम्ही शंखवादन हि केले. परंतु पुढे २०२० च्या सुरवाती पासूनच कोविड -१९ चे परिणाम हिंदुस्थानासह जभरात दिसु लागले. शंख वादनामुळे नागरिकांना आपल्या शरीरातील बदला मुळे खूप फायदा झाला.२०२० व २०२१ हे वर्ष पूर्ण आभासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले.

श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट, अयोध्या चे, विशेष निमंत्रण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे.....

केशव शंखनाद पथकास शंखवादनासाठी  निमंत्रण

|| जय श्री राम||

       आपल्या देशाचे राष्ट्रमंदिर अर्थातच श्रीराम मंदिर, अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान आमच्या केशव शंखनाद पथकास शंखवादनासाठी  निमंत्रित केले असून आमच्या सह संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा बहुमान आम्ही समजतो. अयोध्येच्या श्री  रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या सप्ताहा मध्ये शंख वाजवण्यासाठी १११ शंख वादकांना आमंत्रित केले गेले होते. केशव शंखनाद पथकाचा डिसेंबर महिना तर सरावासाठी सज्ज होताच पण, १५ जानेवारी पर्यंत हे दिवस सरावासाठी खास तीन ते चार तास श्री ओंकारेश्वर  मंदिरात  (शनिवार पेठ,) येथे चालू होते. या पंधरा दिवसात मीडिया, फोटोग्राफर आणि पुणेकर यांच्या भेटी दररोजच केशव शंखनाद पथकाला झाल्या. पुणेकरांचा हे प्रेम पाहून मन हर्षून गेले.. कुणी आणि किती जण सांगू की त्यांनी आम्हाला शुभेच्छा रूपी मदत केली, भेटी दिल्या ,सत्कार समारंभ तर पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी आमंत्रित करून अगदी उत्साहात झाले. आम्हाला  कळले,  या या ठिकाणी १११ जणांना सत्कारासाठी बोलावलंय  असे कळले तरी खरच  खूप छान वाटले.   श्री प्रभू रामचंद्रासाठी जे रेशीम वस्त्र विणले गेले ते पुण्यातल्या हातमागावरच दोन धागे राम के लिये… त्यातही हातमागाच्या उद्घाटना समयी केशव शंखनाद पथकाला बोलावले होते.

अयोध्येतील श्रीरामांना भेटण्याची  आस  सर्वानाच होती.१९९२ च्या सुमारास बाबरी मशीद वाद, मंदिराबाबत चर्चा, वादविवाद ऐकले होते पण आता प्रत्यक्ष ४५०ते ५०० वर्षानंतरचा हा  श्रीराम प्रभू रामचंद्रांचा वनवास संपून श्रीराम पुन्हा आपल्या जन्मभूमीत गर्भ  गृहात विराजमान झालेत,  ही सुवर्णभाग्याचीच गोष्ट होती.

शंख वाजवायचे फायदे

स्नायू मजबूत होतात

शंख फुकायाने यामुळे पशरीराच्या निरनिराळ्या भागांवर दबाव देतो ज्यामुळे केवळ आपले स्नायूच बळकट होत नाही तर विविध आजारांचा धोकाही कमी होतो. याशिवाय, हे आपल्या सुवाशयांच्या स्नायूंना मजबूत करते आणि गुदाशय कर्करोगाचा धोका कमी करते. मार्ग मूत्राशय, पोटाचा खालील भाग, डायाफ्राम, जाती आणि मानेच्या स्नायूंसाठी उत्तम ठरते. पाने या सर्व अंगांचा व्यायाम होतो. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे याने गुदाशयाचे स्नायू मजबूत होतात.

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी

आपण शंख पुंश्कता तेव्हा आपल्या फुफ्फुसातील स्नायू बाढतात, बररोज शंख फुंकता निरोगी फुफ्फुर राहते.

थायरॉईड ग्रंथीत सुधार

आपल्या सायरॉईड ग्रंथी आणि व्होकमत दोरांचा देखील व्यायाम करते.

बोलण्यात स्पष्टता

शंख कगण्याने यामुळे आपल्या बोलण्यात स्पहता येते बोलण्यासंबंधी समस्या दूर होतात. बोलणा-या मुलांना शेखजाना त्याने त्यांची बाणी सुधारेल. 

सुरकुत्या दूर होतात

शंख वाजवताना चेहन्याचे स्नायू ताणले जातात बामुळे सुरकुत्या आपोआप दूर होण्यात मदत मिळते.

त्वचा रोग दूर होतात

रात्रभर पांखात सोडेसे पाणी साठवा आणि दुसर्या दिवशी सकाळी वा पाण्याने आपल्या त्वचेची मालिश करा. घामुळे त्वचेचे बरेच आजार, पुरण, अलर्जी इत्यादी बरे होतात.

हार्ट अटॅकपासून बचाव

नियमित शंया कुंवाप्याने हृदयातील बॉकेज उघडण्यास मदत होते.

ताण दर होतो

शंख फुंकण्याने डोक्यातील सर्व विचार दूर होतात आणि ताण कमी होण्यात मदत मिळते. 

नकारात्मकता दूर होते

शंख फुंकण्याने त्यातून ॐ ध्वनी बाहेर पडतो ज्याने नकारात्मकता दूर होऊन घरात सकाराामकता पसरते. असा विश्वास आहे की शंखातून निघणारा ध्वनी आसपासच्या वातावरणातील विविध प्रकारचे जलू व हानिकारक कीटकांपासून स्वच्छ करण्यात मदत करतो.

Scroll to Top